अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-मागील तीन महिन्यांत रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा कठीण परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर उभारून प्रशासनाला वेळेवर सर्व प्रकारची मदत
करून केलेल्या योग्य नियोजनामुळेच तालुक्यात कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविता आले असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. कोपरगावात नुकताच कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, वासुदेव देसले,
ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा, महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, सरपंच प्रतिनिधी सूर्यभान कोळपे,
डॉ. दीपक पगारे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. राजेंद्र रोकडे, पत्रकार, खाजगी कोविड केअर सेंटरचे प्रतिनिधी, परिचारिका, आशा सेविका प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी, रुग्णवाहिका चालक प्रतिनिधी,
सफाई कामगार प्रतिनिधी यांच्यासह आरोग्य विभाग, कोपरगाव नगरपरिषद, महसूल विभाग, पंचायत समिती आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम