दिलासादायक ! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहचला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पहिल्या लाटेपाठोपाठ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगरकरांच्या तोंडाचे पाणी पळवले होते. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी आणि मृत्यूतांड्व यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप दिसून आला.

मात्र प्रशासकीय नियोजन, लसीकरण, उपाययोजना याचा जोरावर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरू लागली आहे.

यामुळे आता बाधितांची संख्या देखील कमी होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यात गेल्या २४ तासात म्हणजेच सोमवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण वाढले असून ते आता ९७.१० टक्के इतके झाले आहे.

सोमवारी जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २३५ इतकी झाली आहे.

नगर शहरातील रुग्ण कमी होऊन फक्त तीनच पॉझिटिव्ह आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आकडेवारीमध्ये बरे झालेली

  • रुग्ण संख्या : २,७०,९८२
  • उपचार सुरू असलेले रुग्ण : २२३५
  • मृत्यू नोंद : ५,८७२
  • एकूण रुग्ण संख्या : २,७९,०८९
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe