LPG Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, आजपासून LPG सिलेंडरच्या किमती कमी होणार?

Published on -

LPG Price : आज संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे या बजेटला महत्व प्राप्त झाले आहे. अर्थमंत्र्यांपुढे कमकुवत झालेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचे आव्हान असणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळे आज संसदेत सादर होणाऱ्या बजेटमध्ये या किमती कमी केल्या जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जाणून घ्या महानगरांमधील घरगुती आणि एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत

दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1769 रुपये तर कोलकातामध्ये 1870 रुपयांना उपलब्ध आहे. जाणून घेऊयात सर्व महानगरांमधील एलपीजी सिलिंडरची किंमत

दिल्ली: १७६९ रुपये

कलकत्ता: १८७० रुपये

मुंबई: १७२१ रुपये

चेन्नई: १९१७ रुपये

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर

पाटणा – ११५१ रुपये

आयझॉल – १२१० रुपये

श्रीनगर – ११६९ रुपये

कन्याकुमारी – ११३७ रुपये

रांची – १११०.५ रुपये

शिमला – १०९७.५ रुपये

अंदमान – ११२९ रुपये

लखनौ- १०९०. ५ रुपये

उदयपूर – १०८४.५ रुपये

इंदूर – १०८१ रुपये

मुंबई – १०५२.५ रुपये

भोपाळ – १०५८.५ रुपये

अहमदाबाद – १०६० रुपये

आज कमी होणार किंमत?

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करणार असून त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीचा आढावा घेऊन निर्णय घेतात. 1100 रुपयांना मिळत असणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी होऊ शकते, अशी आशा अनेकांना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe