Aadhaar-Pan Link: पॅनशी आधार लिंक (Aadhaar link with PAN) करण्याची शेवटची तारीख आता संपणार आहे. 30 जूननंतर पॅनला आधारशी लिंक केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. त्यामुळे तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर तीन दिवसांत करा. जर तुम्ही 30 जूनपूर्वी तुमचा पॅन आधारशी लिंक केला असेल तर दंड कमी होईल.
यापूर्वी यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु आधारशी पॅन लिंक करण्याची तारीख 500 रुपयांच्या दंडासह 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. 31 मार्चपूर्वी पॅनशी आधार लिंक करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत होती.

1000 रुपये दंड भरावा लागेल –
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234H नुसार 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास 1000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. पुढील वर्षापर्यंत, तुमचा पॅन आधारशी लिंक न करताही काम करत राहील.
यासह, तुम्हाला 2022-23 साठी आयटीआर (ITR) आणि रिफंड प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, परंतु 31 मार्च 2023 नंतर, तुमचा पॅन डीएक्टिवेट (Pan deactivate) केला जाईल. यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
भारी दंड आकारला जाऊ शकतो –
जर तुमचा पॅन एकदा निष्क्रिय झाला तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या पॅन कार्डने म्युच्युअल फंड (Mutual funds), स्टॉक (Stock) आणि बँक खाती उघडण्यासारख्या गोष्टी करू शकणार नाही. याशिवाय तुम्ही तुमचे बंद असलेले पॅन कार्ड (PAN card) कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 72B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
आधारशी पॅन लिंक कसे करावे –
- प्राप्तिकराच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉग इन करा
- क्विक लिंक्स विभागात जा आणि आधार लिंक वर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल
- येथे तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाका
- ‘मी माझे आधार तपशील प्रमाणित करतो’ हा पर्याय निवडा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. ते भरा आणि नंतर ‘Validate’ वर क्लिक करा.
- दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल.
फाईन कसा भरावा –
- पॅन-आधार लिंकिंगसाठी या पोर्टला भेट द्या https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean
- पॅन-आधार लिंकिंग विनंतीसाठी, CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा आणि लागू कर निवडा.
- मायनर हेड 500 आणि मेजर हेड 0021 अंतर्गत एकच चालानमध्ये फी भरणे आवश्यक आहे.
- नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
- तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा नंतर पत्ता प्रविष्ट करा.
- शेवटी captcha भरा आणि Proceed वर क्लिक करा.