मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रात गोलमाल? पुरावे सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

Published on -

मुंबई : विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४, २०१९ या विधानसभा निवडणुकीत कोपरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याचा दावा अभिजीत खेडकर आणि डॉ. अभिषेक हरिदास या पुण्यातील दोन याचिकाकर्त्यांनी केला आहे. अॅड. समीर शेख यांच्या माध्यमातून खेडकर आणि हरिदास पुण्यातील न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षण, शेती, मालमत्ता विविध वाहनांच्या किंमती याबाबत ज्या नोंदी केल्या आहेत, त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात विसंगती आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. २०१९ मध्ये शिंदे यांनी शेअर्समध्येही गुंतवणूक केली होती. त्याचा तपशीलही प्रतिज्ञापत्रातून त्यांनी वगळला असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe