“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”; नाना पटोलेंचा सुजय विखेंवर पलटवार

Content Team
Published:

औरंगाबाद : राज्यात महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून भाजपकडून आघाडीला डिवचण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्याच टीकेला काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

भाजप (BJP) आणि महाविकास आघडीमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. अशातच काही वेळा एकमेकांवर खोचक टीका करताना देखील दिसतात. अशीच टीका सुजय विखे पाटील यांनी केली होती.

महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shivsena) आहे. त्यात राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण त्यांची मनमानी सुरु असते. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे,

ती बिचारी काहीच बोलत नाही. तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत म्हणत सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघडीवर निशाणा साधला होता.

याच टीकेला नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार. सुजय विखे पाटील याच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. कारण तो अजून मुलगा आहे अशी टीका करत खोचक टोला देखील लगावला आहे.

देशातील वाढत्या महागाईवरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात 136 दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे.

सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe