पराभवानंतर काँग्रेसची बैठक; पक्षाबाबत काय निर्णय घेणार?

दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेृतत्वात पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने ४०३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला आहे.

राज्याच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी समितीची बैठक आज संध्याकाळी होणार आहे.

तसेच काँग्रेसने संसदीय दलाची (CPP) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत संसद अधिवेशनाच्या (Parliamentary Sessions) दुसऱ्या सत्राबाबत चर्चा होणार आहे.

तसेच अधिवेशनाचे दुसरे अर्थसंकल्पीय सत्र सोमवारी सुरू होणार आहे. हे अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. या अधिवेशनात पक्ष म्हणून पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. ही बैठक आज रविवारी साडेदहा वाजता सुरू होणार होती. मात्र, ही बैठक अर्धा तास अगोदर सुरू करण्यात आली आहे.

या बैठकीत दुसरे अधिवेशनाच्या बाबत काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन खारगे, आनंद शर्मा, के. सुरेश आणि जयराम रमेश तसेच आदी नेते यांच्या उपस्थितीत दुसरे अधिवेशनाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी दिल्लीत १० जनपथ निवासस्थानी पोहचले आहेत.

दरम्यान, यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना स्वीकारावा लागल्यामुळे राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सोनियांनी तूर्तास पदभार सांभाळला आहे. मात्र, आता पुढे काँग्रेस पक्षाचे काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.