अहमदनगर : भाजपचे (Bjp) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मोठमोठ्या शब्दात काँग्रेस (Congress) पक्षावर हल्लाबोल केला आहे. पाच राज्यात विधानसभा निकालावर (Assembly results) ते बोलत होते.
या पाचही राज्यात काँग्रेसचा मोठ्या अंकांनी पराभव झाला आहे, यामुळे ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित असल्यानं मी भाजपमध्ये आलो’, अशी भाजपची खिल्ली उडवत वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी केले आहे.
तसेच ते म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashatra) काँग्रेस पक्ष लाचार बनलाय. राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आणि शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी होत आहे. काँग्रेसनं आता ४० चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवी सुरुवात करावी, असा जोरदार टोला सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.
त्याचबरोबर शिवसेनेची (Shivsena) स्पर्धा ही नोटाबरोबर असल्याचं गोवा आणि उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं. ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. जे प्रभारी राज्यात रोज बोलतात त्यांना पाहून गोव्याच्या जनतेनं त्यांना नाकारलं असल्याची खोचक टीका सुजय विखे यांनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.