काँग्रेस पक्ष बदनाम होत आहे ! आयटी पार्क प्रकरण किरण काळे व्यक्तीद्वेषाने हाताळतात….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- आयटी पार्क प्रकरणाला राजकीय रंग देऊन केवळ व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या किरण काळे यांचे प्रयत्न म्हणजे ते काँग्रेसचा उपक्रम नव्हे या प्रकरणात तमाम काँग्रेसजण काळे यांच्या मताशी जसे सहमत नाही,

तसे आयटी पार्कमध्ये औद्योगिक विकासासाठी काय केले जाते? याची माहिती नाही, पण मूळ प्रश्नाला बगल देऊन वैयक्तिक द्वेषापोटी आरोप होतात, यामुळे काँग्रेस पक्ष बदनाम होत आहे.

याकडे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आणि महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात आदि पक्षश्रेष्ठींनी लक्ष द्यावे, अशी विनंती अहमदनगर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.

सेना-भाजपने काँग्रेस म्हणून नव्हे तर वैयक्तिक श्री.काळे म्हणून या प्रकरणाला महत्व दिले. त्या सेना-भाजपबद्दल आपली भुमिका बाजू-विरोधी असे काही नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मात्र, श्री.काळे यांनी या प्रकरणात शिवालयात जावून शिवसेनेचे दिवंगत नेत्यांना अभिवादन करतांना येथूनच काँग्रेसला दिशा मिळते अशा प्रकारचे वक्तव्य करुन श्री.काळे यांचा पक्षनेते ना.थोरात, आ.डॉ.तांबे यांच्यावरचा विश्वास कमी झाल्याने अनपेक्षित अधोरेकित होते. असे श्री.भुजबळ यांनी सांगितले.

या संदर्भात शहर काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांची मते आजमावून पक्षश्रेष्ठींसमोर ती मांडणार आहे, असेही श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe