काँग्रेसचा शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- शिर्डी नगरपंचायतची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची मागणी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व फ्रंटलच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकार्‍यांनी केली असून यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक स्वबळावरच लढविली जाईल सर्वांनी तयारीला लागा, असे आश्वासन दिले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समनव्यक ज्ञानदेव वाफारे,

साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, विधानसभा नेते सुरेश थोरात, शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक राजेंद्र बोरुडे, सुभाष सांगळे यांच्या उपस्थितीत आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली.

वाढती महागाई, शिर्डी शहरातील वाढलेली बेरोजगारी, शहरातील सत्ताधारी व प्रस्थापित नेत्यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य शिर्डीकर यांच्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शिर्डी शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे.

याचाच आधार घेत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान या आयोजित बैठकीत युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अनुसूचित जमाती विभाग, मागासवर्गीय विभाग,

अल्पसंख्यांक विभाग, उद्योग व व्यापार विभाग, सोशल मीडिया विभाग या सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेत संघटन बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe