Cooking Hacks : सिलिंडरमध्ये कमी गॅस शिल्लक आहे? तर मग वापरा ‘ही’ कुकिंग हॅक, पडेल उपयोगी

Cooking Hacks : महागाईच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसच्या (Gas) किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरात (Kitchen) काम करत असताना महिला गॅस जपून वापरतात.

कधी कधी स्वयंपाकाच्या वेळी गॅस खूप कमी असतो. त्यामुळे महिलांना स्वयंपाक कसा करावा असा प्रश्न पडतो. परंतु जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही कमी गॅसमध्ये (Low gas) स्वयंपाक करू शकता.

तुमच्या एलपीजी सिलेंडरमध्ये (LPG cylinder) खूप कमी गॅस शिल्लक असल्यास अशा परिस्थितीत ओल्या भांड्यांवर (Wet pots) स्वयंपाक करणे टाळावे.

स्वयंपाक करण्यापूर्वी, भांडे पूर्णपणे कोरडे करा, त्यानंतरच भांडे बर्नरवर (Burner) ठेवा. कोरड्या भांड्यांवर (Dry pots) स्वयंपाक केल्याने गॅसचा वापर कमी होतो.

याशिवाय शिजवताना ते चांगले झाकून ठेवावे. झाकलेले अन्न शिजवताना एलपीजी स्वयंपाकाचा गॅस खूप कमी वापरला जातो. याशिवाय भाजी करणार असाल तर आधी उकळून घ्या. उकळल्यानंतर भाजी पॅनमध्ये खूप लवकर शिजते.

स्वयंपाकासाठी कुकर (Cooker) वापरण्याचा प्रयत्न करा. कुकरमध्ये शिजवल्यास ते लवकर शिजते. त्यामुळे तुमचा एलपीजी गॅस खूप कमी वापरला जातो.

तसेच डाळ भात केला तर तो शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवा. असे केल्याने तुमचा गॅसचा वापर जास्त होणार नाही. कमी गॅसवर स्वयंपाक करण्यासाठी हे कुकिंग हॅक्स उत्तम आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe