iPhone 13 Offer : मस्तच.. पुन्हा स्वस्तात मिळतोय iPhone 13, 40 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदीची सुवर्णसंधी

Published on -

iPhone 13 Offer : आयफोनच्या किमती इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा जास्त असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही तो विकत घेता येत नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 13 हा फोन लाँच केला होता. आपल्या सर्व फोनप्रमाणे यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली आहेत.

कंपनीच्या या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु, आता या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे. यावर उपलब्ध असणाऱ्या डिस्काउंटनंतर तुम्ही तो 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत घेऊ शकता. अशी भन्नाट ऑफर कुठे मिळत आहे जाणून घ्या.

40 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार

फ्लिपकार्टवर iPhone 13 ची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु,सुमारे 10,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर फोनची किंमत 59,999 रुपये इतकी होईल. तर यावर निवडक बँकांमधील व्यवहारांसाठी 1,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. दुसरीकडे, फोनवर उपलब्ध एक्सचेंज ऑफरनंतर, तुम्ही तो 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत घेऊ शकता.

फोन A15 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असणार

iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात येत आहे. तर या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून A15 बायोनिक चिपसेट वापरला आहे. तसेच दुसरीकडे, या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात 12MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स दिली आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. अॅपलच्या पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज असणाऱ्या या फोनचा रंग मिडनाईट हा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe