Maharashtra news : राजकारणी मंडळी सत्तानाट्यात रंगली असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,२४९ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक ९७८ रुग्ण आढळून आले.
एका दिवसात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. एक जुलैपर्यंत २३,९९६ इतकी सक्रीय कोरोनाची रुग्णांची संख्या होती. अहमदनगर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे.
एक जुलैला जिल्ह्यात २९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १३४ रुग्ण उपचार घेत आहेत. मे महिन्यात एक अंकी झालेली ही संख्या आता तीन अंकी झाली आहे. देशातही रुग्ण वाढत आहेत. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्ण १,०९,५६८ आहेत.