करोना संसर्ग वाढतोय, पीएम नंतर सीएमही सक्रीय, काय निर्णय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 maharashtra news : देशातील करोना संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरस्थ पद्धतीने आज दुपारी १२ वाजता संवाद साधणार आहेत.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी पाच वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकांमधून काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दिल्ली आणि कर्नाटकात पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज दुपारी बारा वाजता बैठक बोलाविली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ठाकरे यांनीही राज्यस्तरावर बैठक बोलाविली आहे. सायंकाळी पाच वाजता ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

केंद्रीय स्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांसंबंधी यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तुलनेत करोनाचा संसर्ग अटोक्यात आलेला आहे.

नगर जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. असे असले तरी केंद्रीय पातळीवरून दक्षता म्हणून काय सूचना दिल्या जातात, त्यातील कोणत्या राज्यात लागू केल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe