Corona virus : सावधान ! कोरोना वाढला, २४ तासांत देशभरात ३,३२४ नवीन रुग्णांची नोंद

Content Team
Published:

Corona virus : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूला ब्रेक लागला असताना आता पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे. कारण गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३३२४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण (Positive patient) आढळले आहेत.

सर्वाधिक प्रकरणे पाच राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. सध्या देशभरात 19,092 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या २४ तासात ४०८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. इतकेच नाही तर संसर्गामुळे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) अहवालानुसार, शनिवारी भारतात कोरोना संसर्गाची ३६८८ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (capital Delhi) कोरोनाचे सर्वाधिक 1,520 रुग्ण आहेत.

यानंतर, हरियाणामध्ये 490, केरळमध्ये 337, उत्तर प्रदेशात 275 आणि महाराष्ट्रात 155 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,30,79,188 वर पोहोचली आहे. या महामारीमुळे 5,23,843 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारताचा कोरोना रिकव्हरी रेट आता 98.74% आहे. गेल्या 24 तासात एकूण 2 हजार 876 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशभरात बरे झालेल्यांची संख्या ४ कोटी २५ लाख ३६ हजार २५३ झाली आहे.

दिल्लीत सलग 9व्या दिवशी कोरोना विषाणूचे १००० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. देशाच्या राजधानीत कोरोना संसर्गाचा दर 4.5 टक्क्यांच्या वर कायम आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (World Health Organization) म्हणण्यानुसार ५ टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग दर ‘चिंताजनक’ आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) म्हणाले की, कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत, परंतु परिस्थिती गंभीर नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe