Corona Virus : देशात पुन्हा लॉकडाऊन ? पंतप्रधान मोदींची ‘त्या’ प्रकरणात उच्चस्तरीय बैठक; वाचा सविस्तर

Ahilyanagarlive24 office
Published:
Corona Virus : जगात मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रभाव झपाटयाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंट BF.7 ने हाहाकार माजवला आहे.
यातच देशातील गुजरात आणि ओडिसा या राज्यात कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट समोर आल्याने केंद्र सरकार देखील सतर्क झाले आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामध्ये त्यांनी कोरोनावरील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला.
तर दुसरीकडे सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा देशात लॉकडाउन येणार का हा प्रश्न विचारला जात असून सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावर अनेक चर्चाना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्यस्थितीमध्ये देशातील गुजरात राज्यात दोन तर ओडिसा राज्यात कोरोनाच्या BF.7 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण समोर आले आहे.
भारतीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोविड-19 च्या नवीन प्रकारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली. बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहून पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश दिले. एका ट्विटमध्ये मांडविया यांनी म्हटले आहे की, काही देशांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता, तज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्यास आणि दक्षता वाढविण्यास सांगितले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe