नायलॉनच्या घातक चायना मांजावर विक्रीवर मनपाच्या दक्षता पथकाकडून लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  नायलॉनच्या घातक चायना मांजावर शासनाने बंदी घातलेली असताना, आजही बाजारात सर्रास चायना मांजाची विक्री होत आहे. या घातक चायना मांजामुळे स्वतःसह इतरांचा जीव धोक्या येऊ शकतो.

त्यामुळे अहमदनगर महापालिकेच्या दक्षता पथकांकडून शहरातील पतंग स्टॉलवर शुक्रवारी तपासणी करण्यात आली. तसेच बंदी असतानाही याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

यासाठी मनपाचे पथक सज्ज झाले आहे. या पथकामध्ये दक्षता संनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांच्यासह दक्षता पथकातील नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेंद्र बोरुडे, अमोल लहारे.

विष्णू देशमुख, राजू जाधव, भास्कर आकुबत्तीन, गणेश वरुटे, रिजवान शेख, विष्णू मिसाळ, नंदकुमार रोहकले, भीमराज कांगुडे, गणेश धाडगे, अनिल कोकणे आदी उपस्थित होते. दरम्यान शासनाने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली असली तरी, बाजारामध्ये सर्रास चायना मांजाचे बंडल सहजरित्या उपलब्ध होत आहे.

या चायना मांजामुळे पक्षी तर जखमी होतातच, शिवाय लहान मुलांची बोटेसुद्धा कापली जातात. पतंग उडवताना, मांजा अनेकांच्या गळ्यात अडकल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

अनेक दुचाकीस्वारांचा गतीमुळे क्षणात गळा कापला जाऊ शकतो. मांजामुळे चेहऱ्यालासुद्धा इजा होऊन, त्वचा कापली जाते. यामुळे अहमदनगर शहरात नायलॉनच्या घातक चायना मांजावर विक्रीवर मनपाच्या दक्षता पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe