Cotton Farming : मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याचे क्षेत्र वाढणार ! इतकी होणार लागवड

Ahmednagarlive24 office
Published:

Cotton Farming : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे कपाशी म्हणजेच पांढऱ्या सोन्याखालील क्षेत्रात यंदा सुमारे २० हजार हेक्टरने वाढ होणार आहे.

म्हणजेच १४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यासाठी ६३ लाख २ हजार बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आल्याची माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

यंदा मान्सून वेळेवर पडत असल्याच्या वृत्ताने शेतकरी आनंदला असून, वेगाने खरिपाच्या तयारीला लागला आहे.खरीपपूर्व मशागतीसाठी शेतकरी गुंतला आहे, शेतकरी एकीकडे पेरणीपूर्व तयारीत गुंतला असताना कृषी विभाग देखील बी-बियाणासह खते उपलब्धत करून देण्याच्या नियोजनात मग्न आहे.

अशी करा लागवड

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मुबलक पाऊस पडल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. किमान एक वितभर खोल ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. कपाशी लागवड करताना कोणतीही घाई करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

एकूण ४८ लाख हेक्टर

मराठवाड्यात खरिपाचे एकूण ४८ लाख हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी गतवर्षी १३ लाख ७१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर सर्वात कमी क्षेत्र धाराशिव जिल्ह्यात होते.

मराठवाड्यात नगदी पीक म्हणून कपाशी, सोयाबीन, मका व तूर ही पिके घेतली जातात. लातूर, धाराशिव व हिंगोली हे तीन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकांना प्राधान्य दिले जाते.

गतवर्षी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये १३ लाख ७१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रासाठी ५७ लाख ५३ हजार बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला होता. यावर्षी कपाशी लागवड क्षेत्रात जवळपास २० हजार हेक्टर वाढ होण्याचा आंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार अतिरिक्त बियाणे पाकीट उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe