अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- कळी ढोकेश्वर येथील एटीएम चोरट्यांची चौकशी करताना पोलीसांना एक धक्कादायक माहिती समजली आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे शेतातील घरात बनावट नोटा छापण्याच्या त्यांचा उद्योग समोर आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाहून नोटा छापणारे मशीन, कटींग मशिन, पाचशे, शंभरच्या बनावट नोटा, खराब झालेल्या, चुरगळलेली नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पारनेर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. विकास सुरेश रोकडे (वय 19) (रा. वडगाव सावताळ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम 26 ऑगस्ट रोजी पिकपच्या मदतीने चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींचा छडा लावून विकास रोकडे यास अटक केली होती.
विकास रोकडेच्या घराची, आजीच्या घराची झडती घेण्यात आली, त्यावेळी शेतामधील घरात दडवून ठेवलेले रंगीत झेरॉक्स मशीन, कागदाची रिम, कटिंग मशीन,100 व पाचशेच्या बनावट नोटा,
चुरगळलेल्या, खराब झालेल्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. आरोपी विकासकडे कसून चौकशी केली असता आपण बनावट नोटा तयार करीत असल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पारनेर पोलीस करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम