Hyundai Creta | मार्च 2025 मध्ये भारतीय SUV बाजारात एकच नाव सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलं – Hyundai Creta. दमदार लूक, उत्कृष्ट फीचर्स आणि परफॉर्मन्समुळे ही SUV देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. मार्च महिन्यात क्रेटाने तब्बल 18,059 युनिट्सची विक्री करत विक्री यादीत पहिलं स्थान पटकावलं. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे, कारण मार्च 2024 मध्ये याच गाडीची विक्री 16,458 युनिट्स इतकी होती.
इतर ह्युंदाई मॉडेल्सची स्थिती-
दुसऱ्या क्रमांकावर Hyundai Venue आहे. याने 10,441 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर Hyundai Exter आहे, जिची विक्री 5,901 युनिट्स इतकी असून, ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी घटली आहे.

Hyundai Aura ने देखील चांगली कामगिरी करत 5,074 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, ज्यामध्ये 4 टक्के वाढ झाली. मात्र Grand i10 ने 4,990 युनिट्स विकले असून 1 टक्क्यांची घट नोंदवली आहे. Hyundai i20 च्या विक्रीत सर्वाधिक म्हणजे 14 टक्क्यांची घसरण झाली असून मार्चमध्ये फक्त 4,452 युनिट्स विकल्या गेल्या.
Hyundai Alcazar ने 1,431 युनिट्स विकले असून ती विक्रीत 1 टक्क्यांनी वाढली आहे. Hyundai Tucson ने फक्त 89 युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी कमी आहे. सर्वात तळाच्या क्रमांकावर Hyundai Ioniq 5 आहे, ज्याची विक्री केवळ 19 युनिट्सवर थांबली आहे. या मॉडेलच्या विक्रीत प्रचंड म्हणजे 70 टक्क्यांची घट झाली आहे.
Hyundai च्या एकूण लाइनअपकडे पाहता, Creta ने ज्या पद्धतीने बाजारात वर्चस्व गाजवलं आहे, ते इतर मॉडेल्ससाठी एक मोठा मापदंड ठरू शकतो. ग्राहकांचा कल SUV कडे अधिक वाढत असून, स्टायलिश आणि फीचर-लोडेड वाहनांची मागणी वाढत आहे हे यातून स्पष्ट होते.