अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राज्यात थंडीची लाट सुरु आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज ( 28 डिसेंबर) आणि (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(unseasonal rain)
कडाक्याची थंडी ओसरत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. ऐन थंडीतही पावसानंहजेरी लावल्यामुळे नागरिकही चिंतेत होते.
अनेक ठिकाणी या अवकाळी पावसामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन ऑरेंज ॲलर्टतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो.
या अवकाळी पावसामुळं पुन्हा एकदा बळीराजावर संकट ओढवले आहे. 29 डिसेंबरला पूर्व विदर्भात ऑरेंज ॲलर्ट नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आलाय. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम