२०२३ मध्ये जागतिक मंदीचे संकट; जागतिक बँकेने दिला इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

World Bank :जगावरील कोरोनाचे संकट दूर होते ना होते तोच जागतिक मंदीची चाहूल लागली आहे. तीही दूर नसून पुढील वर्षीचा तिची झळ बसण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँका एकाच वेळी महागाईला प्रतिसाद म्हणून व्याजदरात वाढ करत असल्याने जग २०२३ मध्ये जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.

जागतिक बँकेने आपल्या नवीन अहवालात म्हटले की, जागतिक अर्थव्यवस्था आता १९७० च्या मंदीनंतर सर्वात मोठ्या घसरणीला पोहोचली आहे. मेरिकेपासून युरोप आणि भारतापर्यंत सर्वच देश आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत.

स्वस्त पैशाचा पुरवठा नियंत्रित करून महागाई कमी करण्यास मदत करणे हा त्यामागील हेतू आहे. पण अशा कठोर आर्थिक उपायांमुळे मंदीचे सावट आहे. युक्रेन-रशिया युद्धासह अनेक कारणांमुळे जगाला सध्या विक्रमी महागाईचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याशिवाय पुरवठा साखळीवरही करोना संसर्गाचा परिणाम झाला आहे. करोना लॉकडाऊनमुळे चीनमध्ये मागणी कमी आहे आणि खराब हवामानामुळे कृषी उत्पादनाच्या अंदाजालाही धक्का बसला आहे. ही सुद्धा यामागील कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe