अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- राज्यात गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिकुनगुनियाचा प्रसार वेगाने वाढला असून ऑक्टोबरमध्येच रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे.
पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये राज्यात २ हजार ९४९ रुग्ण आढळले होते. राज्यात करोनाच्या साथीचा प्रसार गेल्या काही महिन्यांपासून मंदावत असला तरी डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव मात्र वाढला आहे.
राज्यात २०१६ साली चिकुनगुनियाचा उद्रेक वाढल्यानंतर २०१७ पासून दरवर्षी प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या काळात रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा कमी राहिली.
गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव जास्त चिकुनगुनियाच्या चाचण्या फारशा झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी घसरण झाल्याचे आढळले. २०२० मध्ये चिकुनगुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते.
यावर्षी मात्र चिकुगुनियाचा प्रसार वेगाने झाला असून जानेवारी ते ऑक्टोबर या काळातच २ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
‘चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा प्रसार हे एडिस इजिप्ती या एकाच डासापासून होत असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव वाढला की चिकुनगुनियाचा प्रसारही वाढतो.
राज्यात २०१८ पासून डेंग्यूचा प्रसार वाढत असल्याने चिकुनगुनियाचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या जिल्ह्यांतच सध्या चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. पुणे, त्यानंतर नाशिक, कोल्हापूर या भागात या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम