पिक फेरपालट जमीनीचे आरोग्य सुधारण्यास ठरले वरदान…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- शेतातील एखादे पिक हे ज्या त्या हंगामापुरते मर्यादित असते. मात्र अधिकच उत्पादन आणि नफा मिळवण्यासाठी त्याच त्या पिकाची लागवड सतत शेतकऱ्याकडून केली जाते.

उलट त्याचा परिणाम हा पिकांच्या उत्पादनांवर होऊन उत्पादन घटत जाते.त्यामागे शेतकऱ्यांनी नीट अभ्यास केल्यास तीच ती पिके लागवड गेल्यामुळे कीडी व रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत जातो.

प्रामुख्याने जमिनीतील काही कीटक व बुरशी आपलं पीक वाचवण्यासाठी आपले प्रयत्न करत आसतात.पण कीडीचा व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करतो.

सरसकट सर्व किटकांना मारणा-या किडनाशकांच्या वापरामुळे किडींच्या नैसर्गिक शत्रू म्हणून आपले मित्र किटक यांचा देखील ऱ्हासा होतो.

तरी शेतकऱ्यांनी याला पर्याय म्हणून कीटकनाशक फवारणी करते वेळी कीटकनाशका सोबत कीट संजिवकांची फवारणी केली पाहिजे.त्यामुळे शेतीस आवश्यक असे कीटक ऱ्हास पावणार नाहीत.

सतत तेच ते पिक घेतल्यामुळे रोग वाढीसाठी अनुकूल असे वातावरण तयार होते. आणि नवनवीन किडींचा प्रादुर्भाव पिकांवर दिसून येऊ लागतो.

त्यामुळे शेतकऱ्याने पिकांच्या फेरपालटाचे तंत्राचा आवलंब केल्यास नैसर्गिक रित्या रोग आणि कीड यांचे नियंत्रण सहज करता येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe