कर्मचाऱ्यांच्या सहभागातून माऊली सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Sushant Kulkarni
Published:

७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांसाठी पुढील १५ दिवस क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वाडिया पार्क क्रीडा संकुलात व माऊली सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते होणार आहे. स्त्री व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी सहा गटात व सहा संघात ही स्पर्धा होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता माऊली सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर, २ मार्च रोजी या स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडणार आहे.

महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्पर्धा प्रशासकीय इमारत, प्रभाग समिती क्रमांक १, प्रभाग समिती क्रमांक २, प्रभाग समिती क्रमांक ३, प्रभाग समिती क्रमांक ४ व शिक्षण विभाग अशा सहा संघांमध्ये होणार आहे. यात मैदानी स्पर्धा, कबड्‌डी, बॅटमिंटन, बुद्धीबळ, कॅरम, क्रिकेट आदी स्पर्धा होणार आहेत. मैदानी स्पर्धेत १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, जलद चालणे, गोळा फेक, ४ x १०० रिले आदी स्पर्धा होणार आहेत. स्त्री व पुरुषांसाठी १८ ते ३० वर्षे, ३० वर्षांवरील ते ४० वर्षापर्यंत, ४० वर्षावरील ते ४५ वर्षापर्यंत, ४५ वर्षावरील ते ५० वर्षापर्यंत, ५० वरील ते ५५ वर्षापर्यंत व ५५ वर्षावरील ते ६० वर्षापर्यंत अशा सहा गटात या सर्व स्पर्धा होणार आहेत.

शनिवारी सकाळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, संतोष टेंगळे, प्रियंका शिंदे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, मुख्य लेखा अधिकारी सचिन धस, सहाय्यक आयुक्त सपना वसावा आदींसह सर्व विभाग प्रमुख, प्रभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. माऊली सभागृहात होणार सांस्कृतिक कार्यक्रम सर्व कर्मचा-यांसाठी पार पडणार आहे. यात कर्मचारीही सहभागी होणार आहेत. रविवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल वाडीया पार्क येथे सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe