Mahindra Car Price Hikes : ग्राहकांना पुन्हा बसला झटका! Scorpio-N नंतर कंपनीने ‘या’ कारच्या किमतीत केली मोठी वाढ

Ahmednagarlive24 office
Published:

Mahindra Car Price Hikes : महिंद्राच्या सर्व कार मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. परंतु, नवीन वर्षात कंपनीने आपल्या काही कार्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी Scorpio-N या कारच्या किमतीत दरवाढ केली होती.

अशातच आता कंपनीने आपल्या Scorpio Classic च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीची ही कार मागच्या वर्षी मार्केटमध्ये लाँच झाली होती. त्यामुळे आता नवीन दरवाढीमुळे ग्राहकांना चांगलाच दणका बसला असून 80,000 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

ग्राहकांना आता मोजावे लागणार इतके पैसे

जर तुम्हाला बेस S प्रकारात Scorpio Classic SUV घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 12.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील. ज्याची किंमत पूर्वी 11.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी होती. तसेच टॉप व्हेरिएंट S11 ची किंमत आता रुपये 16.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे, ज्याची किंमत पूर्वी 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी होती.

इतके असणार बदल

कंपनीची स्कॉर्पिओ क्लासिक मूळ स्कॉर्पिओ सारखीच दिसते. कंपनीने त्यात काही छोटे बदल केले आहेत. उदाहरणार्थ, मिश्रधातूच्या चाकांमध्ये आता डायमंड-कट फिनिश आहे. नवीन ट्विन-पीक लोगो, पुन्हा डिझाईन केलेला बंपर आणि नवीन लोखंडी जाळी मिळते.

तसेच या कारच्या मागील बाजूस, टेल लॅम्पच्या वरचे काळे खांब आता लाल रंगात पूर्ण झाले आहेत. कंपनीची ही एसयूव्ही पाच रंगांच्या पर्यायांमध्ये विकली जाते. यात रेड रेज, नेपोली ब्लॅक, डीएसएटी सिल्व्हर, पर्ल व्हाइट तसेच नुकतेच सादर केलेले गॅलेक्सी ग्रे रंग उपलब्ध आहे.

अशी आहेत फीचर्स

या एसयूव्हीच्या केबिनमधील बदलांमध्ये नवीन ड्युअल-टोन लेदर सीट्स, प्रवाशांसाठी आर्म रेस्ट, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश असणार आहे. स्टीयरिंग व्हीलला आता लेदरेट फिनिश आणि पियानो-ब्लॅक इन्सर्ट मिळतात.

असे असेल इंजिन

कंपनीच्या या SUV मध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे, जे केबल शिफ्ट 6-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. इंजिन 132PS कमाल पॉवर आणि 300NM पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe