Bank EMI : कॅनरा बँकेने (Canara Bank) मंगळवारी वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी किरकोळ खर्च निधी (MCLR) आधारित कर्ज दरात 0.15 टक्क्यांपर्यंत वाढ केली.
बँकेने मंगळवारी शेअर बाजारांना (stock exchanges) ही माहिती दिली. ही वाढ बुधवारपासून (7 सप्टेंबर) लागू होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
एक वर्षाच्या कालावधीसाठी बेंचमार्क MCLR सध्याच्या 7.65 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांपर्यंत वाढेल. कार(car), वैयक्तिक (personal) आणि गृहकर्ज (home loans) यांसारख्या बहुतांश ग्राहक कर्जांचे व्याजदर याच आधारावर ठरवले जातात.
माहितीत म्हटले आहे की एक दिवस ते एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढला आहे, तर तीन महिन्यांच्या कर्जासाठी, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढून 7.25 टक्के झाला आहे.

Customers of 'this' bank are shocked now have to pay more EMI than before
रिझव्र्ह बँकेने (RBI) गेल्या महिन्यात धोरणात्मक दरात वाढ केल्यानंतर सर्व व्यापारी बँका (commercial banks) कर्जावरील (loans) व्याजदरात वाढ (interest rates) करत आहेत.