DA Hike : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या वाढीबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. AICPI निर्देशांकाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ शक्य असल्याचे दिसून आले आहे.
पुढील सहा महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA 46.24 टक्के होणार आहे, DA वाढीनंतर आता कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात DA वाढीची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील बंपर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26000 पर्यंत वाढू शकते.
फिटमेंट फॅक्टर दरांची पुनरावृत्ती शक्य आहे
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना DA वाढीसोबतच फिटमेंट फॅक्टर वाढीचाही लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे. अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटना करत आहेत.
तसेच देशात २०२४ मध्ये आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवता केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.00 टक्के किंवा 3.68 टक्के होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फिटमेंट फॅक्टर वाढ कर्मचाऱ्यांना २०२६ पासून लागू केली जाण्याची शक्यता आहे.
शेवटची वाढ 2016 मध्ये झाली होती
कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये २०१६ मध्ये वाढ करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यानांतर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढेल. फिटमेंट फॅक्टर वाढीचा ५२ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो.
येत्या दोन काळात ४ टक्के DA वाढ होणार
कर्मचाऱ्यांना येत्या काही पुढील दोन महिन्यांमध्ये ४ टक्के DA वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होईल. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांना सरकारकडून आनंदाची बातमी दिली जाऊ शकते.