अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- शेतकर्यांना सौरपंप मिळावे यासाठी सरकारी योजना उपलब्ध आहेत. याचा गैरफायदा घेत किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने एक वेबसाईट तयार केली.
त्या वेबसाईटची जाहीरात करून त्याने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचा विश्वास संपादन केला. या वेबसाईटद्वारे अनेक शेतकर्यांना लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे.
ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस निरीक्षक भोसले यांनी केले आहे.
सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देतो, अशी बतावणी करून शेतकर्यांची लाखो रूपयांची फसवणूक झाली असल्याची बाब येथील सायबर पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
याप्रकरणी किशोर काळे आला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असून त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.
सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देतो, अशी बतावणी करून माझी फसवणूक केली असल्याची फिर्याद राक्षी (ता. शेवगाव) येथील एका शेतकर्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम