कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका : अहमदनगर सह ५ जिल्ह्यांनी सरकारचं टेन्शन वाढवलं !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असताना पाच जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सागंली आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सध्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे. या स्थितीत कोरोनाचं विघ्न पडू नये यासाठी जनतेने खबरदारी घेणं गरजेचे आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी करू नये. गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे. अन्य राज्यांकडे बघून आपण उदाहरण घेतलं पाहिजं. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावं असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं. सध्याच्या स्थितीत अन्य राज्यात संक्रमण कमी आहे परंतु केरळमध्ये भयंकर परिस्थिती आहे. केरळमध्ये यावेळी दर दिवसाला ३० हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत.

अपवादात्मक म्हणजे ६ सप्टेंबरला १९ हजार रुग्ण सापडले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याचं सांगितलं. यात मुंबई-पुण्याचाही सहभाग आहे. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची रुग्णसंख्या 64 लाख 47 हजार 442 पर्यंत पोहोचली आहे.

त्यापैकी 62 लाख 55 हजार 451 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. राज्यातील कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 900 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 574 वर पोहोचला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe