अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अहमदनगरमधील पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर सहा जणांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी तीन वयोवृद्ध नागरिकांना जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोन्याचे दागिने,20 हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी लंपास केली आहे. या घटनेने पाथर्डीत खळबळ उडाली आहे. दरम्यान यामध्ये लिंबाजी नाथ चितळे (वय ६५), बाबुराव गुणाजी उळगे (वय ६५),
कमलबाई लिंबाजी चितळे (वय ५८) सर्व रा. शेवगावरोड, चितळेवस्ती,पाथर्डी यांना कुऱ्हाडीच्या दांड्याच्या साह्याने मारहाण करण्यात आली. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून, हातही फॅक्चर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला.
दरोडेखोरांनी आधी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबुराव गुणाजी उळगे,
लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी आणि बाबुराव यांना जबर मारहाण केली. लक्ष्मीबाई उळगे (वय 60 वर्ष) यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून घेतले. त्यांना मात्र दरोडेखोरांनी मारहाण केली नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम