7th Pay Commission DA Hike Latest News : केंद्रातील मोदी सरकार आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कधीही मोठी भेट देऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ या महिन्यापासून म्हणजेच जुलै 2022 पासून केली जाऊ शकते. देशातील वाढती महागाई, महागडी ईएमआय लक्षात घेऊन मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती
देशातील महागाई दर 2-6 टक्क्यांच्या वर कायम आहे. रिझव्र्ह बँकेच्या मते हा चलनवाढीचा दर सामान्यपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढू शकतो.
महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यास मदत करतो. महागाई भत्ता (DA) वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जातो. सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला होता. अशा परिस्थितीत या महिन्यात महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता ३९ टक्के केला जाऊ शकतो
महागाई भत्त्यासाठी, पूर्वी असे मानले जात होते की त्यात 4 टक्के वाढ केली जाईल. पण औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचार्यांना सध्या 34 टक्के महागाई भत्ता मिळतो, तो वाढवून 38 टक्के करणे अपेक्षित होते. पण महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून ती 39 टक्के केली जाऊ शकते. 1 जानेवारी 2020 रोजी या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17.2 टक्के करण्यात आला होता.
हा डीए 2017 च्या सुधारित वेतनश्रेणी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होता, तर 2007 च्या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 157.3 टक्के होता. त्याच वेळी, 1997 वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 334.3 टक्के होता.