7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतीशय आनंदाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून हे कर्मचारी थकीत डीएची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपू शकते. अशे झाल्यास त्यांच्या बँक खात्यात 2 लाख रुपये येतील.
18 महिन्यांपासून रखडली आहे डीएची थकबाकी

मागील काही दिवसांपासून सरकारकडे केंद्रीय कर्मचारी थकबाकीची मागणी करत आहेत. त्यांची ही थकबाकी 18 महिन्यांपासून रखडला आहे. परंतु, अजूनही याबाबत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
जर या थकबाकीवर सहमती झाली तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येईल. दिवसेंदिवस देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक थकीत डीए मिळावा या मागणीवर ठाम आहेत.
किती पैसे जमा होणार?
अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांच्या बँक खात्यात किती पैसे जमा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्या मतानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्तरानुसार डीएची थकबाकी खात्यात जमा होईल.
अंदाजानुसार, स्तर 1 कर्मचार्यांना 11,880 ते रु. 37,554 पर्यंत DA थकबाकी मिळेल.7 व्या वेतन आयोगाचा विचार केल्यास स्तर 13 कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ आधारावर 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपयांची DA थकबाकी मिळेल. लेव्हल 14 कर्मचाऱ्यांना यापेक्षा अधिक डीए थकबाकी मिळेल. थोडक्यात विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांची डीएची थकबाकी मूळ वेतनाच्या आधारावर वेगवेगळी असेल.
कोरोना काळात महागाई भत्ता वाढवला नाही
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा सरकार वाढवते. सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए दिवाळीपूर्वी 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सरकारने 18 महिन्यांची डीएची थकबाकी भरावी अशी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची अपेक्षा आहे.













