Maharashtra news : तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख तसेच नवाब मलिका यांच्या याचिकेवरील सुनावणी संपली. उच्च न्यायालय उद्या निर्णय देणार. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करून देण्याची मागणी करणारी ही याचिका आहे.
याचिकेला ईडीने विरोध केला आहे.त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, या दोघांविरूद्ध खटला सुरू आहे, त्यांना दोषी धरून शिक्षा झालेली नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकारी नाकारता येत नाही. आम्ही जामीन मागत नाहीत.
तर केवळ मतदानापुरते पोलिस बंदोबस्तात त्यांना नेण्यात यावे, एवढीच मागणी आहे.यावर ईडीने विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीने मतदान करता येणार नाही.
यासंबंधी विविध कोर्टाचे दाखल आहेत. तुरुंगातील व्यक्तीला मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही, असे सांगत ईडीच्या वकिलांना विरोध केला. आता कोर्ट उद्या निकाल देणार आहे.