तृतीयपंथी यांनी घेतलेल्या जागेवर ताबा मारणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- बेकायदेशीर ताबा हटवून पोलीस संरक्षणात गाळा ताब्यात मिळण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अहमदनगर पोटतुकडी नगपैकी महानगरपालिका हददीतील मौजे चौहुराणा बुद्रुक

येथील टी पी स्किम नंबर ०३ मधील प्लॉट नंबर १७ मधील दुमजली इमारत ही (मार्केट यार्ड अहमदनगर ) अजित अनिल औसरकर रा. औसकर मळा वाकोडी रोड दत्त मंदिराजवळ अहमदनगर यांचे मालकीची असून सदर इमारतीचे संपुर्ण देखभाल करण्याबाबत तसेच वापरणेबाबतचे विशेष मुखत्यारपत्र दस्त क्रमांक ७४७१/२०२१ अन्वये अजित औसरकर यांनी मला अधिकार दिलेले आहेत.

सदर इमारतीमध्ये तृतीय पंथ समाजाचे ऑफीस उघडून समजाचे कामकाज करावयाचे आहे. परंतु सदर इमारतीच्या गाळयामध्ये अजय अमृतलाल बोरा रा ख्रिस्तगल्ली अहमदनगर यांनी बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे. सदर इसमास आम्ही वेळोवेळी विनंती केली असता ते आम्हाला सांगतात की,

पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब हे आमचे मित्र असून त्यांच्या मदतीने तुमच्या विरुध्द दरोडया सारखे गुन्हे दाखल करुन तुम्हाला जेल मध्ये बंद करु अशी धमकी देत आहे.

तरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आमच्या तृतीय पंथी समजावर होणारा अन्याय दूर करुन समाजासाठी ऑफीस उघडण्याचे असल्याने बेकायदेशीर ताबा घेतलेल्या अजय अमृतलाल बोरा या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती विरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी तृतीयपंथी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यवेली तृतीयपंथी चे अध्यक्ष राजगुरू यांच्या समवेत तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe