अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- श्रीरापमूर तालुक्यातील बेलापूर या गावामधील एका १४ वर्षीय मुलीला त्याच गावातील २२ वर्ष वयाच्या तरुणाने २३ जुलै रोजी पळवून नेले आहे.
सतरा दिवस उलटूनही तपास न लागल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.
या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लवकर शोध लागावा यासाठी सोमवार ९ ॲागस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला होता.
शहर पोलिसांकडून लवकरच मुलीचा शोध घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम