Mula Dam : मुळा धरणातून तात्काळ पाण्याच आवर्तन सोडण्याची मागणी

Published on -

Mula Dam : राहुरी येथील मुळा धरणातून दोन्ही कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी तात्काळ पाण्याच आवर्तन सोडण्याची मागणी डावा कालव्या अंतर्गत लाभक्षेत्रातून होत आहे. ‘

यंदाचा पावसाळी हंगाम सुरू होऊन तब्बल सव्वा दोन महिने उलटून गेलेले आहेत. जून – जुलै या महिन्यात पावसाची जेमतेम हजेरी राहिली होती. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला, तरीही अजून पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांसह सारेच चिंता व्यक्त करत आहेत.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणात आज अखेर २० टीएमसी पर्यंत पाणीसाठा झालेला आहे. मुळा धरणाच्या उजवा कालव्याखालील राहुरी तालुक्यासह नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील शेती व शेती सिंचनाचे क्षेत्र अवलंबून आहे.

तर राहुरी तालुक्यातील डावा कालव्याखालील जवळपास दहा ते पंधरा गावांमधील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र हे डाव्या कालव्यामुळे ओलिताखाली येते. याबरोबरच या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागतो.

मात्र, यंदा पावसाच्या आशेने डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी कपाशी, भुईमूग, सोयाबीन, मका, बाजरी आदी खरिपाच्या पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत. मात्र आता या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.

मुळा धरणामध्ये जवळपास ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणातून तात्काळ दोन्ही कालव्यासाठी पाणी सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मागील महिन्यात शासनातील काही महत्त्वाच्या मान्यवर यांनी मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता कधी पाणी सोडले जाणार याकडे उजव्या व डाव्या कालव्या खालील भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe