अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहर हद्दीत सावतामाळीनगर परिसरात दोन धार्मिक स्थळे, नागरी वसाहत, तसेच जवळच पोलीस वसाहतदेखील आहे. या परिसरात वाइन शॉप सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांसह भाविकांनी देखील केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील सावतामाळीनगर परिसरात वाईन शॉप सुरु करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संबंधितांनी अर्ज केला आहे.
मात्र, या परिसरात विठ्ठल मंदिर आहे, तसेच संबंधित वाइन शॉप स्थलांतरित प्रस्तावाच्या जागेशेजारी कादर बादशहा कादरी मस्जिद (ट्रस्ट क्रमांक बी १४७) इदगाह रस्ता, सावतामाळीनगर, संगमनेर ही मस्जिद आहे.
येथे नागरी वसाहत देखील आहे. येथे वाइन शॉप सुरू करण्याला अनेकांचा तीव्र विरोध कायम आहे. तसेच येथील रहिवासी, दारूबंदीचे कार्यकर्ते, तसेच भाविकांचा वाइन शॉप सुरू करण्यास तीव्र विरोध आहे.
त्यासंदर्भाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याचे दारूबंदी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम