Maharashtra News:शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात धनुष्य बाण चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. दोन्ही कडून यावर दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. तो देताना स्वत: पक्ष सोडला, तेव्हाचा अनुभवही सांगितला आहे.

file photo
बारामतीमध्ये बोलताना पवार म्हणाले, धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह अशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात.
जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळे चिन्ह घेतले. मी काँग्रेस पक्षाचे चिन्ह मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असेही पवार म्हणाले.