Diabete Diet : मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळपाणी असते खूप फायदेशीर! नियंत्रणात राहते रक्तातील साखरेची पातळी

Ahmednagarlive24 office
Published:

Diabete Diet : आपल्या शरीरासाठी नारळपाणी हे खूप फायदेशीर आहे. इतकेच नाही तर आपण कोणत्याही रुग्णाला भेटायला जात असताना आपण त्यांच्यासाठी फळे आणि नारळपाणी नेतो. कारण त्या रुग्णाने याचे सेवन केले तर आपले शरीर हायड्रेटेड राहते.

त्यामुळे आपले पचन सुधारत असून पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम दिला जातो. तसेच उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन केलं तर आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळपाणी खूप फायदेशीर असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

जाणून घ्या नारळाचे फायदे:

नारळात लॉरिक ऍसिड सारख्या नैसर्गिकरीत्या सॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणात असते. हे ऍसिड आपल्या शरीरात “मोनोलॉरिन” मध्ये रूपांतरित होत असून ते अनेक रोग-कारक जीवांना मारते.

नारळाच्या सेवनाने सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गापासून आपले संरक्षण होते.

तसेच नारळात खालील पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात:

• व्हिटॅमिन सी

• थायामिन (व्हिटॅमिन B1)

• फोलेट

• पोटॅशियम

• मॅंगनीज

• तांबे

• सेलेनियम

• लोह

• फॉस्फरस

• पोटॅशियम

फायबरचा उत्तम स्रोत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारळ हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत असून ताज्या नारळाच्या एका लहान तुकड्यात 4 ग्रॅम आहारातील फायबर सापडते, जे तुमच्या रोजच्या सेवनाच्या 16 टक्के आहे. त्यामुळे दिवसभरात फक्त २ टक्के कार्बोहायड्रेट्सच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात फायबर देणारे नारळ हे मधुमेहींसाठी वरदान आहे.

लक्षात ठेवा या गोष्टी

नारळात चरबीचे प्रमाण जास्त असून विशेषत: “सॅच्युरेटेड फॅट” त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या वाढणाऱ्या वजनाचा त्रास होत असल्यास तर ते मर्यादित प्रमाणात खात जा. नारळ हळूहळू पचत असून जे तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करते. जर तुम्ही हलका नाश्ता केला असेल तर ते तुम्हाला वजन कमी करण्यात आणि साखरेचे व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींमध्ये मदत करत असते.

तसेच हे लक्षात ठेवा की कमी प्रमाणात खाल्लेले ताजे नारळ हे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे ताजे नारळ नसल्यास सुमारे 28-30 ग्रॅम डेसिकेटेड नारळ 2 इंच ताज्या नारळाच्या बरोबरीचे असते. ते तुम्ही खाऊ शकता.

तसेच सुपरमार्केटमधून मिळणारे कोणतेही नारळाचे पदार्थ टाळा, कारण त्यात जोडलेली शर्करा तुमच्यासाठी आरोग्यासाठी चांगली नाही.

ठेवा स्मार्ट देखरेख

मधुमेह असणाऱ्या आणि नसणाऱ्या लोकांसाठी दररोज 25 ते 38 ग्रॅम फायबरचे सेवन करण्याची शिफारस करण्यात येते. मात्र प्रत्येक वेळी योग्य प्रमाणात फायबर मिळवणे किंवा स्वतःला आणि आपल्या आवडत्या पदार्थांपासून वंचित ठेवणे थोडे अवघड होते.

त्यामुळे, स्मार्टफोन ग्लुकोमीटर वापरून आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात येतो. हे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर तुमच्या आहाराचा आणि जीवनशैलीचा प्रभाव समजून घेण्यास मदत करतो. इतकेच नाही तर, तुमच्या मधुमेह आहार चार्टमध्ये कोणताही नवीन खाद्यपदार्थाचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या आरोग्य प्रशिक्षकाचा सल्ला नक्की घ्या, तयामुळे तुम्हाला त्याचा फायदे मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe