Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Business Idea : कमी खर्चात सुरु ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, महिन्याभरातच व्हाल तुम्ही करोडपती

सध्याच्या काळात अनेकजण व्यवसाय सुरु करू लागले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आता कमी खर्चात देखील व्यवसाय सुरु करू शकता.

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला आता सरकार मदत करत आहे. होय, केंद्र सरकार आता तुम्हाला 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे तेही कोणत्याही हमीशिवाय.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामळे तुम्ही आता सरकारी मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. सध्या असाच एक व्यवसाय आहे तो तुम्ही अगदी कमी खर्चात आणि कमी जागेत करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाला वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असते.

खरं तर नैसर्गिक झाडूला एक विशेष महत्त्व आहे. सध्या झाडूचे अनेक प्रकार प्रचलित झाले असून गवत, नारळ, खजुराची पाने, मक्याची भुसा इत्यादीपासून बनवण्यात आलेले झाडू बाजारात पाहायला मिळत आहेत. झाडू त्या उत्पादनांच्या श्रेणीत येत आहे ज्याची मागणी वर्षभर मोठ्या प्रमाणात असते.

असा बनवा झाडू

साधारणपणे केवळ कारागीरच झाडू तयार करत असतात. पण जर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त झाडू बनवायचे असल्यास तुम्ही मशीन घेऊ शकता. तुम्ही आता ऑनलाइन शॉपिंग पोर्टलद्वारे किंवा मार्केटला भेट देऊन मशीन घेऊ शकता. झाडू अनेक प्रकारे बनवता येत असून आता तुम्हाला कोणत्या प्रकारचा झाडू बनवायचा आहे ते तुम्ही ठरवा. कच्चा माल म्हणून तुम्हाला झाडू हँडल कॅप, प्लास्टिक टेप, स्ट्रॅपिंग वायर इत्यादींची आवश्यकता असणार आहे. प्लॅस्टिक टेप, स्ट्रॅपिंग वायरच्या मदतीने झाडू बांधला जातो.

मागणी

भारतात सिंक झाडू (कडक झाडू) आणि फ्लॉवर ब्रूम (सॉफ्ट ब्रूम) या झाडूंना सर्वात जास्त मागणी आहे. कारण असे झाडू फक्त हाताने बनवण्यात येतात. तुम्ही अगदी कमी जागेत झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. गाव असो की शहर, या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

किती आहे खर्च आणि कमाई?

तुम्ही फक्त 15,000 रुपयांमध्ये झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला 40000 रुपये सहज मिळतील. तसेच हे लक्षात ठेवा की, तुमच्या झाडूची गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकी तुमची कमाईही चांगली होईल.