Ahmednagar:  दोन कुटूंबात मारहाण; तोफखान्यात गुन्हा दाखल 

Ahmednagarlive24 office
Published:
dispute in-two-families-filed-a-crime

Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) शहरातील भिस्तबाग चौकात परिसरात (Bhistbagh Chowk) दोन कुटूंबात असणाऱ्या घरगुती वादातून हाणामारी झाली आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दोन्ही कुटूंबानी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणात लक्ष्मी सुनील पवार (वय 20, रा. मुलन माथा ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासू हौसाबाई पवार, नणंद अंजली राजेश धोत्रे, अनिल धोत्रे, फिर्यादी यांचे पती सुनील पवार आणि त्यांच्या मामा मामी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अंजली राजेश धोत्रे (रा. पंचवटी कॉलनी, भिस्तबाग चौक, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मी पवार, लिलाबाई किसन जंगम, बेबी शिंदे आणि दोन अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

अंजली धोत्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान लक्ष्मी, हौसाबाई आणि बेबी शिंदे यांनी लग्नात दिलेले सामान परत द्या, असे म्हणत शिवीगाळ करून घरातील सामानाची उचकापाचक करून सामान फेकून दिले. लाथाबुक्क्यांनी आणि पाईपने मारहाण केली.

लक्ष्मी पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, घरगुती वादामुळे मी माहेरी राहत आहे. गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान आईसह सासरी मुलीचे व माझे दवाखान्याची कागदपत्रे आणण्यासाठी गेले असता शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe