अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करुन वयोवृध्दांना आधार देण्यात आला. महंत ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या आधार फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
टाळेबंदीनंतर नेवासा फाटा येथील शरणपूर वृध्दाश्रमात किराणा साहित्याची गरज भासत असताना आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्यासह फळांचे वाटप करण्यात आले.

ऋषिकेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चांना फाटा देऊन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अभिजित जाधव, नानाभाऊ तुवर, अक्षय होन, गौतम जाधव, अवि जाधव, कुणाल जाधव,
सुरज जाधव, अजय जाधव, पांडुरंग चौधरी, युवराज जाधव, ऋत्विक कानडे, निखिल होन, अजित तुवर, माऊली जाधव, आदेश टेकाळे, निवृत्ती होन, अंकुश जाधव, तेजस जाधव, अंकुश मोरे आदी उपस्थित होते.
आधार फाऊंडेशन गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, कोरोना काळात अनेक गरजू घटकांना जेवण वाटप करण्यात आले. तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत देखील करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम