जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोविड नियंत्रणाचे दृष्टीने उपाययोजनांचे नियोजन, समन्वयन आणि अंमलबजावणी करणेसाठी तातडीने अधिकारी, कर्मचारी यांची गरज भासू शकते.

तसेच कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध होणेकामी सर्वांनी मुख्यालयी उपस्थित रहावे,

असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी भोसले यांनी आदेशात म्हटले आहे की,

जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी उपस्थित राहावे. जिल्हाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.

कोणतीही व्यक्ती, संस्था, किंवा संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा मधील तरतूदीनूसार कारवाईस पात्र राहतील.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe