Diwali 2022 : यंदाची दिवाळी (Diwali in 2022) अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. परंतु, यंदाच्या दिवाळीत (Diwali) फक्त 2 तास फटाके फोडता येणार आहेत.
झारखंडमध्ये (Jharkhand) हा आदेश जरी करण्यात आला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये दिवाळीच्या रात्री 8 ते 10 या दोन तासच फटाके फोडले जाणार आहेत.
फटाके फक्त दिवाळीच्या रात्रीच फोडता येतील
या सूचनांनुसार दिवाळीच्या रात्री फक्त 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडता येतील. छठच्या दिवशी सकाळी 6 ते 8, गुरुपूरबला रात्री 8 ते 10 आणि ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या दिवशी 31 डिसेंबरच्या रात्री 11.55 ते 12.30 पर्यंत फटाके वाजवण्याची परवानगी असेल.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचा हवाला देत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यतींद्र कुमार दास यांनी जारी केलेल्या निर्देशात असे म्हटले आहे की, झारखंडमधील ज्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता चांगली किंवा समाधानकारक आहे, तेथे फटाके फोडले पाहिजेत.
ठरलेल्या वेळेतच फोडता येईल. सक्षम असेल फटाक्यांच्या विक्रीबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत. यानुसार राज्यात केवळ 125 डेसिबलपेक्षा कमी क्षमतेचे फटाके विकता येणार आहेत.
उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल
या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम 188 आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्तांना पत्रही लिहिले आहे.
राज्यातील शहरी भागातही दिवाळीनिमित्त रस्त्यांवर आणि परिसरात फटाके (Firecrackers) विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरांमध्ये मोकळ्या ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी क्लस्टर तयार केले जात आहेत. किरकोळ विक्रेते त्याच क्लस्टरमध्ये दुकान सुरू करू शकतात.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये चार ते पाच क्लस्टर बनवण्यात आले आहेत.याशिवाय प्रशासनाने फटाके विक्रीसाठी काही अटीही घातल्या आहेत. सर्व विक्रेत्यांनी याचे पालन करावे. फटाके विक्रीसाठी परवाना घ्यावा लागतो.