Diwali Food and Recipe : घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करा ‘हा’ पारंपारिक फराळ, चवही आहे अप्रतिम

Published on -

Diwali Food and Recipe : दिवाळीच्या (Diwali) सणापूर्वीच दिवाळीची (Diwali 2022) तयारी सुरु होते. फराळाशिवाय दिवाळीचा सण (Diwali festival) पूर्ण होऊच शकत नाही.

त्यामुळे प्रत्येक घरात फराळ (Diwali Sweet) बनवला जातो. या फराळामध्ये (Diwali snacks) चिवडा,लाडू,चकली,कारंजी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

करंजी –

परंपरेने दिवाळीच्या निमित्ताने (Diwali Food) करंजी बनवल्या जातात. करंज्या मैदा, मावा आणि सुक्या मेव्यापासून ते तयार केल्या जातात.

शेंगदाण्याची चिक्की –

दिवाळीत फराळ म्हणून बनवली जाणारी शेंगदाण्याची चिक्की चवीने परिपूर्ण तर असतेच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर असते. हे शेंगदाणे आणि गूळ किंवा साखरेच्या पाकात तयार केले जाते.

भाजलेले काजू –

घरात पाहुणे आले तर त्याच्यासमोर भाजलेले काजू देऊ शकता. भाजलेले काजू हा एक उत्तम आरोग्यदायी नाश्ता आहे, विशेषत: दिवाळीच्या निमित्ताने काजू देशी तुपात भाजले जातात.

चिवडा –

दिवाळीचा सण चिवड्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भारतीय घरात चिवडा अनेक प्रकारे बनवला जातो. जाड पोहे आणि पातळ पोहे यांचा चिवडा खूप आवडतो. यामध्ये पोह्यासोबतच शेंगदाणे, खोबरे, सुका मेवाही वापरला जातो.

चकली –

महाराष्ट्रातील प्रसिद्ध फराळ, चकलीही दिवाळीनिमित्त खास बनवली जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही बनवली जाते. चकली बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, बेसन इत्यादींचा वापर केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe