Diwali Special 2023:- सध्या दिवाळीचा सण हा संपूर्ण भारतामध्ये धामधुमीत साजरा केला जात असून आपण हिंदू पंचांगाचा विचार केला तर दिवाळीतील जे काही प्रत्येक दिवस असतात त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे.
हिंदू पंचांगाचा विचार केला तर आज अश्विन महिन्यातील कृष्णपक्ष असून त्यातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी दिवाळीच्या दिवसांमध्ये साजरी केली जाते. नेमके या दिवसाचे महत्त्व काय आहे? नरक चतुर्दशी साजरी का केली जाते? इत्यादी विषयी महत्वाची माहिती या लेखात घेऊ.

नरक चतुर्दशीचा शुभ वेळ आणि तिथी
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते व आज 12 नोव्हेंबरला ती साजरी केली जाणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, काली माता आणि श्रीकृष्णाची पूजा प्रामुख्याने केली जाते. त्यादिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्थान करून दिवसाची सुरुवात होते.
साधारणपणे दिवाळीच्या कालावधीत हा धनत्रयोदशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी चा दिवस साजरा केला जातो. यावर्षी 12 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी साजरी केली जात असून या दिवशीच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त देखील आहे.
म्हणजे या वर्षी दोन्ही दिवस एकाच दिवशी आलेले आहेत. नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त हा 11 नोव्हेंबरला शनिवारी दुपारी 1:27 मिनिटांनी सुरू झाला असून त्याची समाप्ती 12 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजून 44 मिनिटांनी संपणार आहे.
म्हणजेच उदय तिथीनुसार विचार केला तर आज म्हणजेच 12 नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जाणार आहे. शुभ मुहूर्ताचा विचार केला तर सायंकाळी 5:31 ते रात्री 8:36 पर्यंत आहे. म्हणजेच या कालावधीत तुम्ही यासंबंधीची पूजा करू शकतात.
नरक चतुर्दशीला पूजाविधी कशी केली जाते?
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे लागतात व या दिवशी भगवान श्रीकृष्ण तसेच यमराज व काली माता, भगवान शिव व हनुमान यांच्या आराधना केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची खास पूजा केली जाते.
नरक चतुर्दशीच्या संबंधित कथा
नरक चतुर्दशीच्या संबंधित जर आपण पौराणिक कथेचा विचार केला तर यानुसार नरकासुर नावाच्या राक्षसाने 16100 स्त्रियांना बंदी बनवून ठेवलेले होते. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना हे कळले तेव्हा त्यांनी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला नरकासुराचा वध केला आणि सर्व 16 हजार 100 स्त्रियांना बंदीवासातून मुक्त केले.
एवढेच नाही तर या सर्व स्त्रियांना समाजामध्ये सन्मान मिळवण्याकरिता श्रीकृष्णाने या सर्व स्त्रियांशी विवाह केला. त्यांच्यासोबतच श्रीकृष्णाला आठ मुख्य राण्या होत्या व या मान्यतेमुळे श्रीकृष्णाला 16 हजार 108 राणी मानल्या जातात. म्हणजेच नरकासुराच्या वधाची तिथी असल्यानेच तिला नरक चतुर्दशी असे म्हणतात.