Krushi Vidyapith Bharti : महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

Tejas B Shelar
Published:

Krushi Vidyapith Bharti:- कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक महत्त्वपूर्ण बदलांसाठी कृषी विद्यापीठांचे कार्य हे अनमोल असे आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या कृषी विद्यापीठांपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे एक महत्त्वाचे विद्यापीठ असून या माध्यमातून शेती संबंधित अनेक प्रकारचे संशोधने केली जातात.

याच महत्त्वाच्या असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांमध्ये सध्या विविध पदांसाठी रिक्त जागा असून त्या जागा भरण्यासाठी आता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. याच भरती विषयाची संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त पदे व पदसंख्या

1- यंग प्रोफेशनल l- 01 रिक्त जागा-
2- यंग प्रोफेशनल ll- 01 रिक्त जागा
3- तंत्रज्ञ- 01 रिक्त जागा

अशाप्रकारे एकूण तीन रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता
1- यंग प्रोफेशनल l- या पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही बीएससी( एग्रीकल्चर ) आवश्यक असणार आहे.
2- यंग प्रोफेशनल ll- या पदाकरिता एग्रीकल्चर इंजिनिअरिंग( स्पेसिलायझेशन इन फार्म मशीनरी अँड पावर इंजीनियरिंग) मध्ये पदवीत्तर पदवी आवश्यक असणार आहे.
3- तंत्रज्ञ- या पदाकरिता मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी डिप्लोमा आवश्यक असणार आहे.

पदनिहाय निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन
1- यंग प्रोफेशनल l – या पदाकरता निवड झालेल्या उमेदवाराला 25 हजार रुपये मासिक वेतन मिळेल.
2- यंग प्रोफेशनल ll – या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराला 35 हजार रुपये मासिक वेतन असेल.
3- तंत्रज्ञ- या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराला अठरा हजार रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी नियुक्ती मिळेल.

अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतींच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अर्ज कुठे पाठवावेत?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार हे ज्येष्ठ ज्वारी ब्रिडर(Senior Sorghum Breeder), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -413722, जि. अहमदनगर या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज हा शेवटच्या तारखेआधी सादर करणे आवश्यक असून उशिरा आलेले अर्ज तसेच अपूर्ण अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe