💥 Diwali Crackers : फटाके फोडा परंतु जपून ! फटाके फोडताना जर भाजले तर काय करावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali Crackers : दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व रंगांचे फटाके दिवाळीमध्ये फोडले जातात. तसे पाहायला गेले तर फटाक्यांमुळे हवेचे आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते.

त्यामुळे शासनाकडून देखील फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घालण्यात आलेले आहे. साधारणपणे मुंबई किंवा मोठ्या शहरांचा विचार केला तर रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे फटाके फोडताना बऱ्याचदा भाजण्याच्या घटना घडून येतात.

त्यामुळे लहान मुले फटाके फोडत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु कितीही लक्ष ठेवून बऱ्याचदा भाजण्याची घटना घडतेच.एवढेच नाही तर आग लागण्याच्या घटना देखील घडण्याची शक्यता असते. या अनुषंगाने जर आपण फटाके फोडताना जर कोणाला भाजले तर घरच्या घरी काय उपाय करावेत जेणेकरून ज्याला त्रास झालेला आहे त्याला त्वरित आराम मिळू शकेल. याच घरगुती उपायांची माहिती आपण या लेखात घेऊ.

फटाके फोडताना भाजले तर हे उपाय करा

1- थंड पाण्याचा वापर- फटाके फोडताना जर हात किंवा पायाला भाजले असेल तर लगेच थंड पाणी टाकावे. जळजळ कमी होईपर्यंत तो भाग पाण्यात भिजत ठेवावा. परंतु यामध्ये चुकून देखील बर्फाचा वापर करू नये. कारण जर बर्फाचा वापर केला तर रक्ताची गुठळी होण्याची शक्यता वाढते व समस्या आणखी वाढू शकते.त्यामुळे थंड पाण्याचा वापर करावा.

2- तुळशीच्या पानांचा रसाचा वापर- भाजल्याच्या ठिकाणी जर आग किंवा जळजळ होत असेल तर त्या भागावर तुळशीच्या पानांचा रस लावणे गरजेचे आहे. रस लावल्यामुळे त्या ठिकाणची जळजळ किंवा आग कमी होते व जळण्याची जी काही चिन्हे आहेत ती त्या ठिकाणी राहत नाहीत. परंतु जर जखम मोठी झाली असेल तर तुळशीच्या रसाचा वापर टाळावा.

3- खोबरेल तेलाचा वापर- फटाक्यांमुळे जळाले असेल व जखम झाली असेल तर खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल लावल्यामुळे त्या ठिकाणी थंडपणा जाणवतो व जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

4- बटाट्याचा रसाचा वापर- फटाक्यांमुळे भाजल्याच्या ठिकाणी कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने देखील फरक पडतो. बटाट्याचा रस थंड असल्यामुळे जळजळ पासून आराम मिळतो व जळजळ कमी होते.
हे करू नये

1- कापसाचा वापर टाळावा- बऱ्याचदा एखादी जखम झाल्यावर आपण त्या ठिकाणी कापूस लावतो. परंतु जळाल्यामुळे झालेली जखम ही इतर जखमेपेक्षा वेगळी असते. त्यामुळे जळाल्यामुळे झालेल्या जखमेवर कापूस किंवा कोणत्याही प्रकारचा कापड लावू नये. जर असे केले तर कापूस किंवा कापड त्या ठिकाणी चिकटतो व तो काढताना खूप वेदनादायी ठरू शकते.

फटाके फोडा परंतु जपून
फटाके फोडताना प्रामुख्याने काही खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. समजा फटाके फोडताना काही आग लागण्याची समस्या उद्भवली तर लागलेली आग पटकन विझवता यावी याकरिता सोबत थोडी वाळू ठेवावी व त्यासोबत पाण्याची बादली ठेवावी.

तसेच फटाके फोडत असताना सिंथेटिक किंवा नायलॉनचे कपडे घालू नये. जेव्हा आपण बऱ्याचदा स्पार्कलर पेटवतो तेव्हा ते गरम होते. म्हणून ते पेटवल्यानंतर सुरक्षित ठिकाणी फेकणे गरजेचे आहे जेणेकरून त्या ठिकाणी कोणाचा पाय पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फटाके फोडताना आजूबाजूला कोणी नाही ना याची अगोदर खात्री करा व मुलं असतील तर त्यांना लांब ठेवून किंवा त्यांच्यापासून दूर अंतरावर फटाके फोडा.