Vastu Tips : तुमच्या घराजवळ चुकूनही लावू नका ‘ही’ झाडे, नाहीतर होईल मोठा अनर्थ

Published on -

Vastu Tips : पर्यावरणासाठी झाडांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. अनेकजण दरवर्षी लाखो झाडांची लागवड करत असतात. झाडांमुळे केवळ सावलीच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. काहीजण घराला शोभा यावी यासाठी काही झाडांची लागवड करतात.

परंतु, काहीजणांना हे माहिती नसते की काही झाडांमुळे आपल्या संकट येते. त्यामुळे या झाडांची आपल्या घराजवळ चुकूनही लागवड करू नये. जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर संकट आलेच म्हणून समजा. ही झाडे कोणती आहेत? पाहुयात त्यांची सविस्तर माहिती.

चुकूनही लावू नका ही झाडे

१. चिंच

चिंचेचे झाड नकारात्मक ऊर्जा खूप लवकर आकर्षित करत असते त्यामुळे घरात चिंचेचे झाड लावू नये असा सल्ला देण्यात येतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंदिरासारख्या कोणत्याही धार्मिक ठिकाणी चिंचेचे झाड लावू शकता.

२. बाभूळ

आयुर्वेद आणि धार्मिक ग्रंथांनुसार, बाभूळ एक अतिशय पवित्र झाड असून त्याला शमीचे झाड असेही म्हटले जाते. परंतु, त्यात काटे असतात त्यामुळे ते घराजवळ लावू नये. केवळ बाभूळच नाही तर सर्व प्रकारची काटेरी झाडे घराजवळ लावू नये.

३. पिंपळ

पिंपळ हे भारतीय धार्मिक परंपरेतही अतिशय पवित्र झाड मानले जाते. असे म्हणतात की एका पिंपळाच्या झाडाला दहा अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते. परंतु, हे झाडही घराजवळ लावू नये. कारण वास्तुशास्त्रानुसार, पिंपळ लावण्यात कोणताही दोष नाही, परंतु ते मोठे होऊन घराचा पाया खराब होण्याची शक्यता असते. मग ते कापण्याचे पाप करण्यापेक्षा त्याची लागवड न केलेलीच बरी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News